अमरावती : आमदार बच्चू कडूंचं दिव्यांगांसाठीचं अन्नत्याग आंदोलन मागे

16 Oct 2017 10:42 AM

गेल्या तीन दिवसांपासून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सुरु केलेलं उपोषण आज मागे घेतलं आहे.
अमरावतीमध्ये दिव्यांग, अनाथ, विधवा, शेतकरी, माजी सैनिकांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. कडूंसोबत प्रहारचे दीड हजार कार्यकर्ते उपोषणाला बसले होते. गेल्या 70 वर्षापासून अनेकांना रेशनकार्ड, आधारकार्ड, इलेक्शन कार्डसासख्या महत्वाची कागदपत्र मिळाली नाहीत. त्यामुळे अनेकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाहीत. असा त्यांचा आरोप आहे. पण कमुख्यंत्र्यांनी भेटीचं आश्वासन दिलं त्यानंतर आज बच्चू कडूंनी आपलं उपोषण मागे घेतलं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV