अमरावती : जुन्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू

24 Dec 2017 08:09 PM

अमरावती शहरात जुन्या वादातून गोळीबार करत एकाची हत्या झालीये, तर ४ जण जखमी झालेत. अन्सार शहा जमील असं मृत व्यक्तीचं नाव आहे. शहरातील आझादनगर  भागात काल रात्री दोन गट समोरासमोर आले. त्यांच्यात दुचाकीचा हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून शाब्दीक वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.. याच वादातून एका गटाने देशी कट्ट्यातून अन्सार जमीलवर गोळीबार केला.
घटनेची माहीती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते, सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे

LATEST VIDEOS

LiveTV