अमरावती : लग्नाच्या वादातून तरुणीची चाकूने भोसकून हत्या

24 Nov 2017 10:51 AM

अमरावतीमधील साईनगर परिसरातील वृंदावन कॉलनीत प्रतिक्षा म्हेत्रे या २४ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. प्रतिक्षाचा लग्नावरून एका मुलाशी वाद होता. या पार्श्वभूमीवर प्रतिक्षा बुधवारी रात्री पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेली होती. मात्र, पोलिसांनी प्रतिक्षाची तक्रार नोंदवून घेतली नाही. याच वादातून आरोपीनं प्रतिक्षावर चाकू हल्ला केला. हल्ल्यानंतर तिला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, आज (गुरुवार) संध्याकाळी तिचा मृत्यू झाला.

LATEST VIDEOS

LiveTV