मुंबई : एकट्याच राहणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम यांचा मृतदेह आढळला

27 Dec 2017 02:57 PM

प्रसिद्ध स्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम सातपुते यांचा मुंबईतल्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहेत. 45 वर्षीय डॉ. पूनम सातपुते अंधेरी पश्चिमेला फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या.

काल रात्री घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने, शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर आत पूनम यांचा मृतदेहच आढळला.

पूनम यांना अतिशय दुर्धर स्वरुपाचा मधुमेह होता. त्यांनी 22 डिसेंबरला फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्यांच्याशी कोणाचा संपर्क नव्हत.

LATEST VIDEOS

LiveTV