नवी दिल्ली : अर्जुन खोतकरांच्या आमदारकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

08 Dec 2017 11:33 AM

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांचा उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेपेक्षा उशिरा भरल्याचा आक्षेप घेत काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी याचिका दाखल केली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी.व्ही.नलावडे यांनी अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द केली होती.

LATEST VIDEOS

LiveTV