यवतमाळ : शेतकऱ्याचं कर्जमाफीसाठी झाडावर चढून आंदोलन

15 Oct 2017 02:45 PM

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि औषध फवारणीतील मृत लोकांना 10 हजारांची तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी यवतमाळच्या शेतकऱ्यानं अनोखं आंदोलन केलं. अर्जुना गावाजवळ झाडावर चढून हे आंदोलन केलंय. धनंजय शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळं पोलिस आणि महसूल यंत्रणेचीव मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

LATEST VIDEOS

LiveTV