उस्मानाबाद : अरुण गोंडगेंच्या पत्नीचा शोध घ्या, खासदार सुप्रिया सुळेंची केंद्राकडे मागणी

16 Oct 2017 02:48 PM

परभणीचे जवान अनिल गोंडगेंच्या पत्नी स्वप्ना यांच्या शोधासाठी आता महाराष्ट्रातील नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केलेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना ट्विट करुन या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केलीय. त्यावर रिजीजू यांनी याप्रकरणी लक्ष घालू असं उत्तरही दिलंय.
अनिल गोंडगे अरुणाचलच्या टेंगा भागात तैनात आहेत. 20 सप्टेबरला स्वप्ना आणि अनिल गोंडगे यांचा किरकोळ वाद झाला.
यानंतर स्वप्ना आपली 1 वर्षाची मुलगी घेऊन घरातून निघून गेल्या. त्यानंतर त्यांचं बोडो अतिरेक्यांनी अपहरण केलं असावं, किंवा त्या चुकीच्या लोकांच्या हाती लागल्या असाव्यात असा संशय आहे.

LATEST VIDEOS

LiveTV