नाशिक : परतीच्या पावसामुळे लासलगावमधील शेतकऱ्यांच्या कांद्याचं नुकसान

11 Oct 2017 09:39 PM

परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याचं मोठं नुकसान झालं. त्यामुळं याचा परिणाम कांद्याच्या दरवाढीवर बघायला मिळतोय. लासलगाव बाजारपेठेत सध्या कांद्याचे दर सरासरी 2500 रुपये प्रतिक्विंटलवर जाऊन पोहोचले आहेत. मागच्या आठवड्यात हेच दर सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल इतके होते. मात्र सोमवारी बाजारपेठ सुरु होताच हे दर थेट प्रतिक्विंटल 2500 हजार रुपयांवर जाऊन पोहोचले, तर नाशिकमधील किरकोळ बाजारात कांद्याचा दर प्रतिकिलो 30 रुपयांवर पोहोचला. दिवाळीच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठा आठवडाभर बंद राहणार आहेत. हीच संधी साधून घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी कांद्याच्या दरात वाढ केल्याचंही बोललं जातं आहे. 

LiveTV