दिग्गज गोलंदाज आशिष नेहराची निवृत्तीची घोषणा

12 Oct 2017 10:33 AM

टीम इंडियाचा सर्वात अनुभवी गोलंदाज आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. होमग्राऊंड असलेल्या फिरोज शाह कोटला मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टी-20 सामन्यानंतर तो निवृत्ती जाहीर करणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना या निर्णयाबाबत आशिष नेहराने माहिती दिली आहे. आयसीसी 2018 मध्ये टी-20 विश्वचषकाचं आयोजन करणार नाही. त्यामुळे चांगली कामगिरी करत असलेल्या युवा खेळाडूंना संधी देणं जास्त योग्य राहिल, असं नेहराने म्हटलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV