औरंगाबाद : खुनी आणि वेडी माणसं सोडली तर भाजपात कुणालाही प्रवेश : हरिभाऊ बागडे

26 Dec 2017 11:09 AM

भाजपातील वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इनकमिंगवर खुद्द भाजपचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीच टोलेबाजी केली आहे. भाजपात खुनाचा आरोपी आणि वेडी माणसं सोडली, तर सध्या कोणालाही सहज प्रवेश मिळतो, अस वक्तव्य हरिभाऊ बागडे यांनी केलं.

भाजपातील इनकमिंग म्हणजे काळानुसार झालेला बदल असल्याची टोलेबाजी हरिभाऊ बागडे यांनी केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या 93 व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या ज्येष्ठ आणि जुन्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमात हरिभाऊ बागडे बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV