पुणे/औरंगाबाद: मराठा आरक्षणाच्या हालचाली, बाळासाहेब सराटे यांच्याशी बातचीत

30 Nov 2017 12:00 PM

कोपर्डीच्या निकालानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरु झाल्यात...पुण्यात निवृत्त न्यायमूर्ती एम.जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्गीय आयोगाची पहिली बैठक पार पडली...राज्य सरकारनं आरक्षणासंदर्भात सादर केलेल्या अहवालाचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
या आधी राज्य मागासवर्गीय आयोगानं अनेकवेळा मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी फेटाळुन लावलेली आहे. मात्र यावेळी आयोगानं नव्या निकषांनुसार सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आयोगाची पुढची बैठक 16 डिसेंबरला होणार आहे

LATEST VIDEOS

LiveTV