औरंगाबाद : शाळेत बाहेरच्या मुलांकडून लाठ्या-साखळीने मारहाण

23 Nov 2017 12:06 PM

नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये शाळेत झालेल्या मारहाणीच्या वादात, बाहेरच्या तरुणांनी हस्तक्षेप केला आणि थेट शाळेत घुसून जबर मारहाण केली. औरंगाबादच्या उस्मानपुरा इथल्या गुरुतेगबहादूर शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. शाळेतील मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

नववीतल्या दोन मुलांचं वर्गात भांडण झालं. त्यापैकी एका मुलाने ही बाब मोठ्या भावाला सांगितली. मारल्याचा राग मनात धरुन विद्यार्थ्याचा भाऊ आणि सात जण हातात लाठ्या-काढ्या आणि साखळ्या घेऊन फिल्मी स्टाईलने शाळेत घुसले. त्यानंतर ते मुलांना मारहाण करु लागले.

शिक्षकांना हा प्रकार समजताच त्यांनी शाळेचं मुख्य गेट लावून घेतल्याने हे गुंड आतच अडकले. त्यामुळे या मुलांची ओळख पटू शकली. उस्मानपुरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV