औरंगाबाद : छावणी परिसरात गॅस्ट्रोच्या साथीचं थैमान, रुग्णांची संख्या 600 वर

13 Nov 2017 12:15 AM

औरंगाबादच्या छावणी परिसरातील 600 पेक्षा अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचं समोर आलं आहे. रात्री उशिरापर्यंत एकापोठापाठ एक शेकडो रुग्ण छावणीतील सामान्य रुग्णालयात दाखल झाले. रुग्णांच्या संख्येमुळे थेट जमिनीवर उपचार घेण्याची वेळ अनेकांवर आली.

छावणीतील विविध भागांतील अनेक नागरिकांना मध्यरात्रीनंतर अचानक पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. पाहता पाहता या त्रासाने संपूर्ण छावणी परिसराला वेढा घातला. लहान मुले, महिला-पुरुष, युवक-युवती, ज्येष्ठ अशा सर्वांना या आजाराने वेढले असल्यामुळे उपचारासाठी नागरिकांनी छावणी सामान्य रुग्णालयात धाव घेतली.

LATEST VIDEOS

LiveTV