औरंगाबादमध्ये गॅस्ट्रोचं थैमान, रुग्णांची संख्या 5 हजारांवर

16 Nov 2017 06:06 PM

औरंगाबादमध्ये गॅस्ट्रोने थैमान घातलं आहे. अवघ्या सहा दिवसात जिल्ह्यातील गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या 100 वरुन 5 हजारांवर पोहोचली आहे.

दूषित पण्याामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचं तपासणी अहवालातून स्पष्ट झालं आहे. तर छावणी परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं परदेशी आरोग्य आधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद केलं आहे.

सहा दिवसांत रुग्णांची संख्या 5 हजारांवर पोहोचली आहे, तर सुमारे दीड हजार जणांना सलाईन लावण्यात आली, असं छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांनी सांगितलं.

LATEST VIDEOS

LiveTV