औरंगाबाद : अंडर-19 मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्सचं द्विशतक

06 Nov 2017 09:00 AM

मुंबईच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्सनं सौराष्ट्राविरुद्धच्या वन डे सामन्यात द्विशतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. औरंगाबाद इथं झालेल्या या सामन्यात जेमिमानं १६३ चेंडूंत नाबाद २०२ धावांची खेळी उभारली. तिच्या या द्विशतकाला २१ चौकारांचा साज होता. जेमिमानं ५२ चेंडूंत अर्धशतक, तर ८३ चेंडूंत शतक झळकावलं. तिनं ११६ चेंडूंत दीडशे धावांचा टप्पा ओलांडला होता. जेमिमाच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं ३४७ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर सौराष्ट्रचा डाव ६२ धावात गुंडाळून मुंबईनं २८५ धावांनी विजय साजरा केला.

LATEST VIDEOS

LiveTV