औरंगाबाद : प्रवीण महाजनांविरोधात साक्ष दिल्यामुळेच गोपीनाथ मुंडेंवर बेछूट आरोप : प्रकाश महाजन

03 Dec 2017 03:18 PM

दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी प्रवीण महाजनांविरोधात साक्ष दिल्याचा राग सारंगी महाजन यांच्या मनात आजही कायम आहे. त्यामुळेच त्या बेछूट आरोप करत असल्याचा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे. प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, याबरोबरच काल सारंगी महाजन यांनी अनेक गंभीर आरोप केले. त्या सर्व आरोपांना खोट ठऱवत सारंगी महाजन या फक्त कुटुंबाची बदनामी करत असल्याचा आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे. उस्मानाबादेतील 29 गुंठ्यांच्या जमिनीवरुन सारंगी महाजन आणि महाजन कुटुंबियांमध्ये वाद सुरु आहे.. मात्र याच वादाबरोबर इतर अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV