औरंगाबाद : मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या सापाची सुटका

23 Dec 2017 11:24 PM

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड शहरात मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यात साप अडकला.. मात्र त्याला न मारता मच्छिमारांनी याची सर्पमित्रांना माहिती दिली.  जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी साप जीव तोडून प्रयत्न करत होता.  मात्र अखेर सर्पमित्रांनी त्याची सुखरुप  सुटका केली. अनेकवेळा माश्यांव्यक्तिरिक्त इतर प्राणीही जाळ्यांमध्ये अडकतात...त्यांना मारलं जातं.. मात्र इथल्या मच्छिमाऱ्यांचं अनुकरण इतर मच्छिमारांनीही करावं, असं आवाहन यावेळी सर्पमित्रांनी केलंय....

LiveTV