औरंगाबाद : राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत

17 Nov 2017 07:54 PM

राज्यातले एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसणार असल्याचं दिसतंय... पगारवाढीबाबतचा अंतरिम अहवाल राज्य सरकारनं  न्यायालयात सादर न केल्यानं एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याच्या तयारीत आहेत..22 डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 14 जानेवारीपासून पुन्हा संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय...इंटकच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय...त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा एसटी प्रवाशांवर संक्रांत येण्याची चिन्हं आहेत...

LATEST VIDEOS

LiveTV