औरंगाबाद : सिनेमागृहात बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यापासून अडवता येणार नाही!

07 Dec 2017 03:09 PM

औरंगाबाद : सिनेमागृहात गेल्यानंतर तुम्हाला बाहेरचे खाद्यपदार्थ प्रवेशद्वारावरच काढून ठेवावे लागतात. मात्र ग्राहकाला हवं ते अन्न सिनेमागृहात नेऊन खाण्याचा अधिकार आहे. सिनेमागृह व्यवस्थापन ग्राहकाला अडवू शकत नाही, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी दिली.

औरंगाबादमध्ये अरुण देशपांडे एबीपी माझाशी बोलत होते. खाद्यपदार्थ सिनेमागृहात नेताना केवळ सुरक्षेच्या दृष्टीने त्याची सर्व प्रकारची पडताळणी होणं गरजेचं आहे. मात्र खाद्यपदार्थ सिनेमागृहात नेण्यापासून मज्जाव करण्याचा व्यवस्थापनाला अधिकार नसल्याचं अरुण देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

LATEST VIDEOS

LiveTV