मुंबई: वांद्रे - गरीबनगरातील झोपडपट्ट्या हटवल्या, रस्ते मोकळे

03 Nov 2017 02:09 PM

बांद्रा टॅमिनल्सलगत असलेल्या गरीबनगर भागात महापालिकेनं अनधिकृत झोपडपट्यावर कारवाई सुरु केलीय. आणि इथला ऐंशी टक्के परिसर मोकळा करण्यात आलाय. याच गरीब नगर भागात मागच्या आठवड्यात महापालिका जेंव्हा अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करत होती, तेंव्हा इथं आग लावण्यात आली होती. त्यामुळे काही दिवस झोपडपटयावरील कारवाई बंद करण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा ही कारवाई सुरु करण्यात आलीय. आणि कालपर्यंत हा बांद्रा टर्मिनल्सलगतचा परिसर मोकळा करण्यात आला. मात्र, काल हायकोर्टानं जे निर्देश दिले त्यानुसार गरीबनगर भागातील अनधिकृत झोपडपट्यावरील कारवाई तूर्तास थांबावावी, असं सांगण्यात आलंय.

LATEST VIDEOS

LiveTV