मुंबई : आझाद मैदान दंगलीचा आरोपी शब्बीर खानने वांद्रे झोपडपट्टी पेटवली!

30 Oct 2017 11:39 AM

वांद्रे स्टेशनच्या पूर्वेकडील बेहरामपाडा झोपडपट्टीत आग लावणारा मास्टरमाईंड सापडला आहे. निर्मलनगर पोलिसांनी शब्बीर खान या 29 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे अटक केलेला आरोपी आणि त्याचे साथीदार हे आझाद मैदान हिंसाचारातील आरोपी आहेत.

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची गुरुवारी दुपारी अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु होती. त्याचवेळी साडे तीनच्या सुमारास झोपड्यांना आग लागली होती. या आगीत शेकडो झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या.

अतिक्रमण कारवाईवेळी अनेकवेळा आग लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या. त्यामुळे ही आगही लागली की लावली याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते.

अखेर पोलिसांनी अधिक तपास करुन शब्बीर खानला अटक केली.

LATEST VIDEOS

LiveTV