बारामतीत टेम्पोच्या ब्रेक तपासणीवेळी केबिन उलटलं

30 Oct 2017 01:39 PM

वाहनाच्या ब्रेक तपासणीच्या वेळी केबिन उलटल्याची घटना बारामतीत घडली आहे. बारामती प्रादेशिक परिवहन विभागाकडून मालवाहतूक गाडीच्या पासिंगसाठी चाचणी सुरु होती. यावेळी इंदापूरमधला एक दुधाचा टेम्पो याठिकाणी ब्रेकच्या चाचणीसाठी आला होते. वाहन चाळीसच्या स्पीडवर असताना ब्रेक दाबल्यास गाडी जागच्या जागी थांबते की नाही, याची तपासणी केली जाणार होती. मात्र ब्रेक दाबताच टेम्पोचं कॅबिनच खाली आलं. यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.

LATEST VIDEOS

LiveTV