बारामती : शिवसेना शहरप्रमुखांच्या गाडीने मुलींना चिरडलं

12 Oct 2017 09:15 PM

बारामती शिवसेना शहरप्रमुख पप्पू माने याच्या कारनं तीन शाळकरी मुलींना चिरडलं. ज्यात दोघींचा मृत्यू झाला असून एकीची परिस्थिती गंभीर असल्याचं समजतं आहे. समीक्षा वीटकर आणि दिव्या पवार अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलींची नाव असून, पायल लष्कर गंभीर जखमी झाली आहे. या तिघीही अंजनगावमधल्या सोमेश्वर विद्यालयात परीक्षेसाठी जात असताना गाडीनं त्यांना चिरडलं. दरम्यान या अपघातानंतर शिवसेना शहरप्रमुख पप्पू माने फरार झाला असून, संतप्त रहिवाशांनी त्याची गाडी पेटवून दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV