बीड : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात उष्णतेमुळे उसाची टाकी फुटून नऊ कामगार जखमी

09 Dec 2017 08:48 AM

बीडमधल्या परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात गरम ऊसाची टाकी फुटल्यानं 9 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. यपैकी 5 कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. महिला आणि बालकल्याण विकासमंत्री पंकजा मुंडेंचा हा कारखाना आहे. उष्णतेमुळे ऊसाची टाकी फुटल्याने उकळता रस कामगारांच्या अंगावर पडला.

LATEST VIDEOS

LiveTV