बीड : एक शरीर, दोन तोंडं, अंबाजोगाईमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म

30 Oct 2017 01:15 PM

बीडच्या एका महिलेने एक शरीर आणि दोन तोंड असलेल्या बाळाला जन्म दिला. अंबाजोगाईमधील स्वाराती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिलेची काल (29 ऑक्टोबर) रात्री 8.30 च्या सुमारास प्रसुती झाली. बाळ आणि बाळंतीण सुखरुप आहेत.

एक शरीर, दोन तोंडं; बीडमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म

प्रसुती विभागातील सर्जन डॉ. संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघड शस्त्रक्रियेद्वारे महिलेची प्रसुती केली. बाळाच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी त्याला शिशू अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. ही महिला मूळची परळी तालुक्यातील आहे.

LATEST VIDEOS

LiveTV