बीड : 50 आणि 100 च्या नोटा बनावट नोटा बनवणाऱ्याला अटक

26 Oct 2017 08:45 PM

50 आणि 100 रुपयांच्या हुबेहूब नोटा छापणाऱ्या एकाला बीडमध्ये अटक करण्यात आली आहे.. शुकुर शब्बीर असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 50 आणि 100 च्या 1 लाख 50 हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत..
मध्यप्रदेश पोलिसांना बीडमध्ये बनावट नोटा छापल्या जात असल्याची टिप मिळाली.. त्यानुसार मध्यप्रदेश पोलिसांनी बीड पोलिसांशी संपर्क साधला... आणि बुधवारी रात्री शब्बीरच्या घरी धाड टाकली...
शब्बीरला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या घरी बनावट नोटा छापण्याची मशीनही सापडली आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV