बीड : शहीद जवानाला मानवंदना द्यायला जाणाऱ्या जवानांना अपघात

03 Dec 2017 08:30 PM

बीड-परळी महामार्गावर बीएसएफ जवानांच्या गाडीला अपघात झाला. शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला जाताना हा अपघात घडला असून नऊ जवान जखमी झाले आहेत.

चंदीगडमध्ये शहीद झालेले जवान मुरलीधर शिंदे यांना मानवंदना देण्यासाठी बीएसएफची गाडी अहमदनगरहून परळीला निघाली होती. या गाडीत एकूण 15 जवान होते. तेलगावजवळ आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला.

दिंद्रुडजवळ संगम फाट्यावर असताना गाडीचे ब्रेक फेल झाले.  अपघातात तीन जवान गंभीर जखमी झाले असून 6 जवान किरकोळ जखमी आहेत.

जखमी जवानांना तातडीनं बीडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV