बीड : महिला पोलिसाची लिंग बदलानंतर रुजू होण्याची मागणी महासंचालकांनी नाकारली

20 Nov 2017 10:30 AM

बीडमध्ये लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर पुन्हा पोलिस सेवेत रुजू करण्याची महिलेची मागणी नाकारण्यात आली आहे. राज्याचे पोलिस महासंचालक सतिष माथूर यांनी ही परवानगी नाकारली आहे.

यासंदर्भात बीड पोलिस अधीक्षकांना पत्र प्राप्त झालं आहे. त्यामुळे संबंधित महिला पोलिस हायकोर्टात जाण्याच्या तयारीत आहे.

माजलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका महिलेनं महिन्याभरापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी एक महिन्याची रजा आणि त्यानंतर पोलिस दलात पुन्हा पुरुष पोलिस म्हणून रुजू करुन घेण्याची मागणी केली होती.

LATEST VIDEOS

LiveTV