बीड : शेतकरी सुकाणू समितीची मुख्यमंत्र्यांविरोधात फिर्याद दाखल

22 Oct 2017 07:42 PM

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात फिर्याद दाखल केलीय. शेतकरी आत्महत्या प्रकरणी बीज जिल्ह्यातल्या दहा पोलिस ठाण्यांत ही फिर्याद दाखल करण्यात आलीय. कर्जमाफीच्या बाबतीत फडणवीस सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघटनांनी केलीय. विशेष म्हणजे  काँग्रेस सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

LATEST VIDEOS

LiveTV