बीड : लिंगबदल करण्याची मागणी करणाऱ्या महिलेच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

23 Nov 2017 12:24 PM

लिंगबदलीसाठी सुट्टी मागणाऱ्या महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या मुद्द्यावर आता मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला आहे. महिला पोलिस कॉन्स्टेबलला लिंग बदलल्यानंतर नोकरीवर पाणी सोडावं लागेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यावर मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालक आणि गृह विभागाला सहानुभूतीपूर्वक विचार करुन निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित घटना ही अगदीच अपवादात्मक असल्यामुळे नियमात तरतूद करून संबंधित महिला कॉन्स्टेबलला सेवेत रुजू करून घेण्यासंदर्भात विचार करावा असंही त्यांनी सांगितलं.
महिला पोलिस कॉन्स्टेबलनं लिंगबदलीसाठी सुट्टीसाठी वरिष्ठांकडे अर्ज केला आणि बीड जिल्ह्यातल्या पोलिस विभागात एकच खळबळ उडाली.

LATEST VIDEOS

LiveTV