बेळगाव : मराठी भाषिकांकडून बेळगावमध्ये काळ्या दिवसाचं आयोजन

01 Nov 2017 03:18 PM

बेळगावसह सीमाभागातील अनेक गावं कर्नाटकात जबरदस्तीने सामिल केल्याच्या निषेधार्थ आज बेळगावमध्ये काळा दिवस पाळण्यात येतोय. डोक्याला, हाताला, दंडाला काळ्या फिती बांधून  हजारो मराठी भाषिकांनी आज मूक मोर्चा काढला. मोर्चानंतर मराठी भाषिकांनी बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी महाराष्ट्रात सामिल झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी केली. या मोर्चाला हिंसक वळण लागू नये यासाठी कर्नाटक पोलीस प्रशासनातर्फे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर या मोर्चावर आहे.

LATEST VIDEOS

LiveTV