गुजरात : मणिशंकर अय्यर माझी सुपारी देण्यासाठी पाकिस्तानात गेले होते : नरेंद्र मोदी

08 Dec 2017 09:42 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पन्हा एकदा मणिशंकर अय्यर यांना टार्गेट केलं. मी पंतप्रधान झालो तेव्हा मणिशंकर अय्यर पाकिस्तानात गेले होते. तिथं जाऊन भारत-पाकिस्तान संबंध मोदींना रस्त्यावरुन हटवल्याशिवाय सुधारणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. रस्त्यावरुन हटण्याची भाषा म्हणजे, माझी सुपारी देण्यासाठीच ते पाकिस्तानात गेले होते, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांच्यावर केलाय. गुजरातच्या भाबरमधील प्रचारसभेत मोदींनी अय्यर यांच्यावर आसूड ओढलेत. कालच अय्यर यांनी मोदींना नीच म्हटल्यानंतर विरोधकांसह राहुल यांनीही अय्यरना मोदींची माफी मागण्यास सांगितलं होतं. त्यानंतर अय्यर यांनी पंतप्रधानांची माफी मागितली होती.

LATEST VIDEOS

LiveTV