भंडारा : लग्नाच्या वाढदिनी महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

24 Dec 2017 02:45 PM

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यात भारताचे चार जवान शहीद झाले असून शहीदांमध्ये महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्राच्या वीरपुत्रावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचं पार्थिव भंडारा जिल्ह्यातल्या पवनी या त्यांच्या मूळगावी आणलं जाणार आहे.

दुर्देव म्हणजे शहीद मोहरकर यांच्या लग्नाचा आज चौथा वाढदिवस होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई-वडिल असा परिवार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV