मुंबई : फेरीवाला मारहाण : हल्ला करणारे दोन फेरीवाले मनसे कार्यकर्त्यांनीच पकडून दिले

31 Oct 2017 11:54 AM

मनसेचे मालाडमधील विभाग प्रमुख सुशांत माळवदे मारहाण प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सुशांत माळवदे यांना मारहाण करणाऱ्या दोन जणांना मनसे कार्यकर्त्यांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

मारहाण करणाऱ्या दोघांना मनसे कार्यकर्त्यांनी भाईंदरमधून पकडलं. हे दोघे मालाड पोलिसांच्या ताब्यात आहेत. मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी मनसे कार्यकर्ते गेले होते. त्याचवेळी अचानक फेरीवाल्यांच्या जमावाने सुशांत माळवदे आणि त्यांच्या सोबतच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला.

LATEST VIDEOS

LiveTV