भिवंडीमध्ये फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट

17 Oct 2017 10:27 AM

कल्याण-भिवंडी बायपसजवळ एका फर्निचर कंपनीला भीषण आग लागली. पहाटे साडेपाचच्या सुमारास लागलेली ही आग धुमसत असून, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

हिंदवेअर नावाची ही क्रॉकरी कंपनी आहे. या कंपनीच्या गोडाऊनमध्ये आग लागली आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान,  अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम करत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV