भिवंडी : नवी वस्ती भागात इमारत कोसळली, बचावकार्य सुरु

24 Nov 2017 10:30 AM

भिवंडीच्या नवी वस्ती भागात इमारत कोसळल्याची घटना घडली. चार मजली इमारत होती, अशी माहिती मिळते आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. 5 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे, तर ढिगाऱ्याखाली आजून 17 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

LATEST VIDEOS

LiveTV