भिवंडी : ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटलं, बस पुलावरुन 70 फूट दरीत कोसळली

11 Dec 2017 12:15 PM

ठाण्यात लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी बसचा भिवंडीत सैतानी पूलजवळ अपघात झाला. बस पुलावरुन 70 फूट खाली कोसळली. या अपघातात 32 प्रवासी जखमी झाले आहेत. धुळ्यातील एका कुटुंबातील मुलीचं लग्न वसईतल्या मुलाशी होणार होतं. बसमध्ये सुमारे 60 प्रवासी होते. बस भरधाव चालवताना ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला.

LATEST VIDEOS

LiveTV