बिहारमध्ये 3 वेगवेगळ्या अपघातात 11 जणांचा बुडून मृत्यू

05 Nov 2017 10:21 PM

बिहारमध्ये 3 वेगवेगळ्या अपघातात बुडून 12 जणांचा मृत्यू झाला. पटना, हाजीपूर आणि समस्तीपूरमध्ये नदीत बुडाल्यानं 12 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण बेपत्ता आहे. बचाव पथक बेपत्ता असलेल्यांचा शोध घेत आहेत. पाटण्याच्या फतुहामधील मस्ताना घाटमध्ये फिरण्यासाठी आलेले 11 जण गंगा नदीत बुडाले यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला. दुसरी घटना समस्तीपूरमध्ये घडली. गवताची बोट नदीत पलटली. या बोटीत 30 जण होते. त्यापैकी 3 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, तर इतरांचा शोध सुरू आहे. तिसरी घटना हाजीपूरमध्ये घडली. गंगा नदीत अंघोळीसाठी गेलेले 4 जण बुडाले त्यातील 3 जणांचा मृत्यू झाला.

LATEST VIDEOS

LiveTV