बिटकॉईनचं मूल्य 15 हजार डॉलरच्या घरात, बिटकॉईन म्हणजे नेमकं काय?

07 Dec 2017 10:03 PM

सध्या जगभरात धुमाकूळ घालणाऱं आभासी चलन म्हणजेच बिटकॉईननं आज ऐतिहासिक उच्चांक गाठलाय. आज बिटकॉईनचं मूल्य 15 हजार अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचलंय. वर्षभरात बिटकॉईननं 1 हजार अमेरिकन डॉलरवरून 15 हजार अमेरिकन डॉलरवर उसळी घेतलीय.  असं असलं तरी बिटकॉईनचा हा फुगा कधीही फुटू शकतो असं भाकीत भारतातल्या अर्थतज्ज्ञांनी वर्तवलाय. कोणत्याही व्यवहारासाठी आभासी चलनाचा वापर भारतात बेकायदेशीर मानला जातो. असं असलं तरी आंतरराष्ट्रीय बाजारात बिटकॉईनंची लोकप्रियता वाढत चाललीय. आणि त्यामुळंच त्याचं मूल्यही वाढत असल्याचं समजतंय.

LATEST VIDEOS

LiveTV