नोएडात भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार, सुरक्षारक्षकासह भाजप नेते शिवकुमार यांचा मृत्यू

16 Nov 2017 11:36 PM

दिल्लीतील नोएडात अज्ञात हल्लेखोरांनी भाजपा नेत्याच्या कारवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात स्थानिक भाजप नेते शिवकुमार यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे.
नोएडात दिवसाढवळ्या गुन्हेगारांनी हा हल्ला केला असून, आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक भाजपा नेते शिवकुमार स्वतःच्या सुरक्षारक्षकांसमवेत जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या गुन्हेगारांनी भाजपा नेत्याच्या फॉर्च्युनर कारवर अंदाधुंद गोळीबार केला आहे.
भाजपा नेत्यासह त्या तिघांनाही गोळ्या लागल्या आहेत. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिवकुमार व त्याच्या दोन सुरक्षारक्षकांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV