लखनौ : ताजमहल हा भारतीय संस्कृतीवरील डाग : भाजप आमदार

16 Oct 2017 05:48 PM

ताजमहल हा भारतीय संस्कृतीवरील डाग असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार संगीत सोम यांनी केलं. ते लखनऊमध्ये बोलत होते. ताजमहाल बांधणाऱ्यांनी उत्तर प्रदेश आणि भारतातील हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम केल्य़ाचा घणाघातही त्यांनी यावेळी केला. दरम्यान लाल किल्ला देशद्रोह्यांनीच बांधलाय, मग मोदी तिथे ध्वज फडकवणं थांबवणार का अस प्रत्युत्तर देत एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी सोम यांच्यावर पलटवार केला. विशेष म्हणजे याआधी उत्तर प्रदेश सरकारनं पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहालला वगळल्याने मोठा वाद पेटला होता.

LATEST VIDEOS

LiveTV