पुणे : 'आपलं सरकार'च्या जाहिराती वादाच्या कचाट्यात, आघाडी सरकारच्या कामाचं भाजपकडून श्रेय

06 Nov 2017 11:57 AM

तीन वर्षेपूर्तीच्या मुहूर्तावर फडणवीस सरकारनं केलेल्या जाहिराती वादात सापडल्या आहेत. कारण यातील अनेक कामं ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच झाल्याचं आता उघड होतंय. तसा दावाही राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. पुणे जिल्ह्यातील शांताराम कटके या शेतकऱ्यानं सरकारकडून मिळालेल्या अनुदानातुन शेततळं केल्याची जाहिरात करण्यात आली. त्याचबरोबर पुण्यातील कौसरबाग भागात राहणाऱ्या रईसा सय्यद या महिलेला मिळालेल्या ई सेवा केंद्राच्या माध्यमातुन लाभ झाल्याचं जाहिरातीत दाखवण्यात आलं. पण या दोन्ही व्यक्तींना ज्या योजनांचा लाभ झाला त्या योजना काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळात मंजुर झाल्याचं समोर आल. या सगळ्या वादाला वैतागून शांताराम कटके हे त्यांच्या घराला कुलुप लावून गायब झाले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV