वेस्टर्न कमोडमुळे आरोग्याला धोका : बोहरा समाजाचे आध्यात्मिक गुरु

22 Dec 2017 10:36 AM

बोहरा समाजाचे आध्यात्मिक गुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी समाज बांधवांना भारतीय पद्धतीचं शौचालय वापरण्याचं आवाहन केलं आहे. पाश्चात्त्य पद्धतीच्या शौचालयाने आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे हा बदल करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. बोहरा समाजातल्या नागरिकांना यासंदर्भात फोनवरुन मार्गदर्शन करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. वांद्रे भागात राहणाऱ्या एका तरुणीला यासंदर्भात एक फोन कॉल आला होता त्यावरून हा प्रकार उघड झाला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV