पालघर: बोईसरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

07 Dec 2017 10:20 AM

मुंबईलगतच्या बोईसरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर घटनास्थळी तपास करताना मानवी सांगाडे सापडल्यानं खळबळ उडालीय. पालघर जिल्ह्यातल्या बोईसर दांडा पाडातल्या किराणा स्टोरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. कारवाईदरम्यान पोलिसांनी 5 महिलांसह एका युवकाला अटक केली होती.. तपासादरम्यान घटनास्थळी एक मृतदेह पुरला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खोदकाम सुरू केलं आणि त्यांच्या हाती मानवी सांगाडा सापडला. हा सांगडा कुणाचा आहे याचा पोलीस तपास करताहेत.. 

LATEST VIDEOS

LiveTV