मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड मोहीम

25 Dec 2017 08:39 AM

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बोरीवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्रकल्प राबवण्यात आले. दिवसातील फावल्या वेळेत वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन केल्यास पर्यावरणासोबतच आपलं आरोग्यही निरोगी राहिल असा संदेश यामधून देण्यात आला. रायगडच्या महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने तर रायगड भूषण सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून संजय गांधी पार्कमध्ये हा उपक्रम पार पडला. दरम्यान या उपक्रमाला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरही उपस्थित होते.

LiveTV