कॅटलोनिया प्रदेश स्पेनपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा

28 Oct 2017 10:48 AM

स्पेनमधील कॅटलोनिया प्रांताच्या संसदेने स्पेनपासून स्वतंत्र होत असल्याची घोषणा शुक्रवारी केली. कॅटलोनियाने स्वातंत्र्याच्या बाजूने कौल दिला असला, तरीही काही काळासाठी सार्वमताचा कौल स्थगित ठेवण्यात आला होता. कॅटलोनिया हे एक स्वतंत्र, सामाजिक लोकशाहीवादी राष्ट्र असून त्याला स्वत:ची ओळख मिळाली पाहिजे, असे या देशाच्या संसदेने म्हटले आहे. मात्र, ही घोषणा होताच स्पेनमधील सरकारने कॅटलोनियाची स्वायत्तता रद्द केली असून, या प्रांतावर आपली थेट राजवट लादली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV