पंढरपूर : धनत्रयोदशीला लाखो दिव्यांना चंद्रभागा उजळली

17 Oct 2017 11:48 PM

पंढरपुरमध्ये धनत्रयोदशीला चंद्रभागा लाखो दिव्यांनी उजळून गेली आहे. भाविकांनी आज चंद्रभागेच्या घाटांवर दीपोत्सव साजरा केला. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असल्याने घरोघरी दिव्यांची आरास केली जाते. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून वारकरी आणि पंढरपूरकर मिळून पंढरपुरात चंद्रभागेच्या घाटांवर दिव्यांची आरास करतात. यंदा नदीच्या जवळपास 14 धाटांवर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला.

LATEST VIDEOS

LiveTV