चंद्रपूर : शिंदेवाडी विश्रामगृहाजवळ बिबट्या जेरबंद, वनविभागाची कारवाई

27 Dec 2017 03:24 PM

चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाडीत एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने शिंदेवाडी परिसरात धुमाकूळ घातला होता. बिबट्याच्या दहशतीनं नागरिक घराबाहेर पडायला घाबरत होते. वनविभागाने विश्रामगृहाबाहेर बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावला होता. रात्री बिबट्या त्यात अडकला आणि शिंदेवाडीकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.

LATEST VIDEOS

LiveTV