चंद्रपूर : 'त्या' डॉक्टरांना आम्ही गोळ्या घालू, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

25 Dec 2017 08:18 PM

केंद्रीय गृहराज्यमंत्रीच जर गोळ्या घालण्याची भाषा करु लागले तर देशात कायदा-सुव्यवस्था कशी राहणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण चंद्रपुरातील हंसराज अहिरांचं वादग्रस्त वक्तव्य. लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्या डॉक्टरांनी नक्षली संघटनेचं सामील व्हाव आम्ही त्यांना गोळ्या घालू अशा वल्गना अहिरांनी केली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुरात सरकारी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरचं उद्घाटन होतं. मात्र सुट्ट्यांच्या मोसमात डॉक्टरांनी कार्यक्रमाला दांडी मारणं पसंत केलं. त्यामुळे नाराज गृहराज्यमंत्र्यांनी थेट कायदा हातात घेण्याचीच भाषा केली.

LATEST VIDEOS

LiveTV