चंद्रपूर : चोरांच्या हत्येप्रकरणी घरातील 4 जणांवर गुन्हा दाखल

06 Dec 2017 06:06 PM

चंद्रपुरात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराचाच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घरातील सदस्यांनी चोराला त्याच्याच चाकूने भोसकल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी हलदर कुटुंबातील चौघांना हत्येप्रकरणी अटक केली आहे.

चंद्रपुरातील शामनगर भागात चोरी आणि हत्येचा थरार घडला. चोरीच्या हेतूने रितेश गुप्ता आणि पंकज ठाकूर हे दोघं रात्री दोन वाजता हलदर कुटुंबाच्या घरात घुसले. आवाजामुळे घरातील काही जण जागे झाले आणि चोर घरात घुसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

LATEST VIDEOS

LiveTV